https://www.facebook.com/share/v/fGybjt1QFgNgXqn1/?mibextid=oFDknk
बेळगांव:डिजीटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन सोहळा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ यांच्या त्यांच्या उपस्थितीत शहरातील संकम हॉटेल येथे पार पडला.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते डिजिटल न्यूज असोसिएशनच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आमदार राजू शेठ यांच्या हस्ते असोसिएशनच्या लोगोचे लोकार्पण करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या आजचे युग डिजिटल आहे.माझ्या 26 वर्षांच्या राजकीय जीवनात प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि डिजिटल मिडीयाचा मोठा वाटा आहे. अतिशय महत्त्वाची भूमिका मीडियाने निभावली आहे . लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे मोठे कार्य आहे. मी कधीही कोणत्याही माध्यमांशी भेदभाव करणार नाही. येथील सर्व माध्यमांबद्दल माझ्या मनात आदर आहे.
माझी इच्छा आहे की डिजिटल न्यूज असोसिएशन लोकांच्या वतीने आणि पक्षपात न करता कार्य करण्यासाठी अस्तित्वात आले पाहिजे.आमचे सरकार आणि माझे समर्थन आणि शुभेच्छा सदैव डिजिटल न्यूज असोसिएशनला आहेत असे सांगितले.
त्यानंतर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ राजू सेठ यांनी डिजिटल न्यूज असोसिएशनचा लोगो चे अनावरण केले आणि संवाद साधला, ते म्हणाले त्यांना खरी बातमी हवी आहे, सत्य सांगा, लोकांना चांगली बातमी द्या, जग डिजिटल झाले आहे, आता कोणतीही बातमी क्षणभर तुमच्या हातात आहे. त्यामुळे जनतेला सत्य सांगा, असे सांगून डिजिटल न्यूज असोसिएशनच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देईल, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी डिजिटल न्यूज असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर गौन्डी यांनी प्रास्ताविक केले. डिजिटल न्यूज असोसिएशन भारतात तिसऱ्या क्रमांकावर आणि दक्षिण भारत डिजिटल न्यूज असोसिएशनमध्ये प्रथम नोंदणीकृत बेळगाव शहरात डिजिटल न्यूज असोसिएशन सुरू करण्याचा आम्हाला अभिमान आहे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बेळगोजी , उपेंद्र बाजीगर व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आ.एफ.एस सिद्धानगौडा ,जे.डी.एस नेते प्रमोद पाटील डिजिटल न्यूज असोसिएशनचे पदाधिकारी इक्बाल जकाती,दीपक सुतार महादेव पवार,कृष्णा शिंदे, प्रसाद कंबार रत्नाकर गौंडी,व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकार यावेळी उपस्थित होते.