बेळगाव शहरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. पांगुळ गल्ली परिसरातील तीन आणि शनी मंदिर परिसरातील दोन दुकाने चोरट्यांनी शुक्रवारी रात्री फोडली .पाच दुकानातून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य लंपास केले आहे.
संस्कार साडी या दुकानातून गल्ल्यातील रोख रक्कम आणि महागड्या साड्या चोरल्या आहेत.न्यू लाईफ मेडिकल दुकानाचे शटर खोलून दुकानात प्रवेश करताना चोरटे सी सी टी व्हि मध्ये कैद झाले आहेत.चोरी करणारे चार जण असून ते सगळे तिशीच्या आतील आहेत.मेडिकल दुकानातून नक्की किती साहित्य चोरीला गेले आहे हे अद्याप समजलेले नाही.मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे श्वान पथकाच्या द्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.एका रात्रीत चोरट्यांनी पाच दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गाने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.