बेळगांव : शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीला कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी सांबरा येथे आयोजित गावमर्यादीत कुस्त्या उत्सहात पार पडल्या. सुमारे 57 हून अधिक कुस्त्या झाल्या. वाढदिवसाच्यानिमित्ताने कमिटीचे सदस्य शितलकुमार तिप्पन्नाचे यांनी या कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या.
महालक्ष्मी यात्रेनिमित्त आगामी आखाड्याची जागृती व्हावी यासाठी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी कमिटीच्यावतीने या कुस्त्या भरवण्यात केल्या होत्या. सहभागी सर्व मल्लांना रोख रक्कम आणि खाऊचे वाटप करण्यात आले. लक्ष्मण यड्डी, बसवानी जोई, भीमसेन पालकर, अर्जुन जाधव, एम डी करबनांवर आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या.
मैदान यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, महेंद्र गोठे, शिवानंद पाटील, नवीन पाटील, भुजंग गिरमल, नितीन चिंगळी, मोहन हरजी, सिद्राई जाधव, शिवाजी मालाई, यल्लाप्पा हरजी, विनायक चिंगळी, लक्ष्मण जोई, उमेश चौगले यांनी परिश्रम घेतले. पालक आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.