भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये आज दिनांक 04/02/2024 रोजी ग्राम चलो अभियानाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली, ग्रामीण मंडळ मधील सर्व विस्तारक व संयोजक यावेळी उपस्थित होते, याप्रसंगी बोलताना बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव म्हणाले की संपूर्ण देशामध्ये ग्राम चलो अभियानाला सुरुवात झाली आहे, ग्रामीण मंडळ मध्ये संघटनेला मजबूत बनविण्यासाठी विस्तारक व संयोजक म्हणून नेमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याला वाटून दिलेल्या गावामध्ये एक दिवस पूर्ण 24 तास राहून बूथ कमिटी बैठक,
लाभार्थ्यांना संपर्क, गावातील समाज प्रमुखांना संपर्क तसेच ग्राम वास्तव्य या माध्यमातून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400+ खासदार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी उतरले पाहिजेत राष्ट्र बांधणीच्या या कार्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलुया असे ते म्हणाले, यावेळी बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सु. अंगडी म्हणाल्या विस्तारक म्हणून दुसऱ्या गावात जाणे आणि पक्षासाठी वेळ देणे खुप महत्त्वाचं आहे पुन्हा बेळगाव मध्ये भाजपचा खासदार निवडून आणुया असे त्या म्हणाल्या तसेच नूतन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री सुभाष पाटील यांचे सुद्धा भाषण झाले, याप्रसंगी ग्रामीण मंडळ मधून केंद्र सरकार तर्फे रेल्वे खात्यामध्ये सल्लागार समितीवर सल्लागार म्हणून प्रदीप पाटील, मल्लाप्पा कांबळे, तीप्पाजी मोरे, रामाप्पा कलभावी, अर्जुन डोंबले आदींची निवड झाल्याबद्दल भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,
व्यासपीठावर भाजपा बेळगाव जिल्हाउपाध्यक्ष श्री युवराज जाधव, जिल्हा खजिनदार श्री मल्लिकार्जुन माद्दन्नावर, बेळगाव नगरसेविका सौ. विना विजापुरे, अभियानाचे जिल्हा संचालक श्री गुरु मेटगुड, ग्रामीण माजी आमदार श्री मनोहर कडोलकर आदी उपस्थित होते, अतिथिंचे स्वागत श्री पंकज घाडी यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री सिद्धप्पा हुक्केरी यांनी केले तसेच शेकडो भाजपा कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.