This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सरकारी नोकर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमच्या वतीने सन्मान*

*सरकारी नोकर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमच्या वतीने सन्मान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव दिनांक वीस बारा २०२३ रोजी सकाळी आठ वाजता महानगरपालिकेचे डीसी एडमिन श्री उदय कुमार तलवार व प्रवीण कुमार यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी शांताई कार्याध्यक्ष विजय मोरे आणि सर्व आश्रमामधील आजचा आजींच्या वतीने श्री उदयकुमार तळवार सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विजय मोरे यांनी उदय कुमार यांचे कौतुक केले एक कर्तव्यदक्ष अधिकारी बेळगाव महानगरपालिकेमध्ये कार्य करत असताना आणखी एक मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काही अडचणी आल्यास त्यांना मदत करण्याची जबाबदारी आणि त्यांच्या वरती दिलेली आहे आणि ती योग्य प्रकारे करून नोकर संघातील सर्वांना त्यांच्या अडचणी दूर करण्याचे संधी त्यांना मिळालेली आहे आणि त्याच प्रमाणे शांताई साठी त्यांनी कित्येक वर्षापासून आश्रमासाठी भेट देऊन सहकार करण्यात आलेले आहेत.

त्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी उदयकुमार यांच्याबरोबर आलेले श्री प्रवीण कुमार हेही पर्यावरण अधिकारी पहिलीच वेळ शांताईला भेट दिले त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उदय कुमार यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने जे काय सामाजिक कार्यात काम करत असलेल्या सर्व संस्थांना सहकार करायचं आश्वासन दिल्या त्यानंतर सर्व आज्या याने त्यांचे आरती ओवाळून त्यांना आशीर्वाद देण्यात आला शांताईतल्या सर्व मंडळी यावेळी उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24