This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*होमगार्ड समालोचक डॉ. किरण रुद्रनायक सेवेतून बडतर्फ* राज्य सरकारचा आदेश, भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध : वरिष्ठ पातळीवरून प्रकरणाचा तपास

<span class=*होमगार्ड समालोचक डॉ. किरण रुद्रनायक सेवेतून बडतर्फ* राज्य सरकारचा आदेश, भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध : वरिष्ठ पातळीवरून प्रकरणाचा तपास" title="*होमगार्ड समालोचक डॉ. किरण रुद्रनायक सेवेतून बडतर्फ* राज्य सरकारचा आदेश, भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध : वरिष्ठ पातळीवरून प्रकरणाचा तपास" decoding="async" srcset="https://dmedia24.com/ichawhoo/2023/12/images-2023-12-25T223625.011.jpeg 375w, https://dmedia24.com/ichawhoo/2023/12/images-2023-12-25T223625.011-242x300.jpeg 242w" sizes="(max-width: 375px) 100vw, 375px" />
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव जिल्हा होमगार्ड समालोचक म्हणून २०१८ पासून सेवा करणाऱ्या डॉ. किरण रुद्रनायक यांच्यावर करण्यात आलेला आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. राज्य सरकारचे कार्यदर्शी डी. एस. नळीन यांनी सदर आदेश जारी केला आहे.

होमगार्ड वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवा बजाविणाऱ्या डॉ. किरण रुद्रनायक यांनी गृहरक्षकांकडून पैसे घेणे, घटक अधिकारी डॉ. किरण रुद्रनायक आणि गृहरक्षकांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सदर आरोप खरे ठरले आहेत. कर्नाटक गृहरक्षक नियम १९६३ च्या उपनियम ३ सी (५) चे उल्लंघन करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा गृहरक्षक दल समालोचक पदावरून तत्काळ काढून टाकण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. सदर आदेशाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांना सादर करण्यात आली आहे.

गृहरक्षक दलात सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीत, तसेच वेतनामध्ये कपात करून कशिमन खाण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वी अनेकवेळा करण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणतेच ठोस पुरावे उपलब्ध नसल्याकारणाने कर्मचाऱ्यांचा नाईलाज झाला होता. तर होमगार्ड म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अनेकवेळा लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कोणताच ठोस पुरावा नसल्याने तक्रार दाखल करणे शक्य झाले नव्हते. मात्र वरिष्ठ पातळीवरून बेकायदेशीर प्रकरणाचा तपास करण्यात आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24