This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हिरालाल समरिया बनले मुख्य माहिती आयुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिरालाल समरिया बनले मुख्य माहिती आयुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली 6 : देशाचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हीरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त हिरालाल समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ आज दिली.हिरालाल समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.

हिरालाल समरिया यांच्या विषयी

हिरालाल समरिया यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी या दुर्गम आणि लहान गावात झाला. ते 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता झालेल्या समारंभात हिरालाल समरिया यांना केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. वाय.के. सिन्हा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य माहिती आयुक्त पदावर हिरालाल सामरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हिरालाल समरिया यांची कारकिर्द

हिरालाल समरिया यांचा जन्म 14 सप्टेंबर 1960 रोजी राजस्थानमधील भरतपूरजवळील पहाडी या छोट्याशा गावात झाला. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून बीई सिव्हिल (ऑनर्स) चे शिक्षण घेतले. आत्तापर्यंत ते कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव आणि अतिरिक्त सचिव पदावर काम केले आहे. रसायने आणि खते मंत्रालयातील सहसचिव, तसेच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातही त्यांनी आपली सेवा दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now