बेळगांव:आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रामलिंगखिंड गल्ली येथे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, आज बाळासाहेबांचा जन्मदिवस योगायोगानं काल अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि बाळासाहेबांचा एक संकल्प पूर्ण झाला, पण त्याचं बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न अजून अपुर आहे, त्यासाठी भविष्यात एकत्रित पणे लढू आणि संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न साकार करून बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहू असे मनोगत युवा नेते शुभम शेळके यांनी व्यक्त केले, नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी सुद्धा अभिवादन करत मनोगत व्यक्त केलं. तसेच महाद्वार रोड क्रॉस नंबर 3 येथे बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, शिबिरासाठी मुंबई हुन आलेल्या डॉक्टरांनी शिबिराची माहिती दिली. प्रसंगी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर,मंदिर कमिटी अध्यक्ष मारुती जोशीलकर,पांडुरंग जाधव,शिवराज पाटील, रवींद्र हुलजी,प्रभाकर सांबरेकर,दिलीप बैलूरकर,विनायक हुलजी,प्रवीण रेडेकर,सचिन दळवी,दत्ता पाटील,राजकुमार बोकडे,प्रवीण तेजम,वैभव कामत,ओमकार बैलूरकर,श्वेत तवनशेट्टी,महेश टंकसाळी,राजू कनेरी,बाळासाहेब डंगरले,प्रथमेश शिरोळकर,यल्लाप्पा मुचंडीकर,प्रकाश मल्लापुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.