This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रिद्धी सिद्धी महिला मंडळचा हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वी पार*

*रिद्धी सिद्धी महिला मंडळचा हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वी पार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिद्धी सिद्धी महिला मंडळ तर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके व  प्रज्ञा शिंदे तर अंगणवाडी शिक्षका कल्पना जाधव अनिता बेळगुंदकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.सदर कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता टेंगेनकेरी गल्ली येथे पार पडला.

प्रारंभी प्रमुख पाहुण्या मीनाताई बेनके व  प्रज्ञा शिंदे तर अंगणवाडी शिक्षका कल्पना जाधव,अनिता  बेळगुंदकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना मीनाताई व यांनी आपले विचार व्यक्त केले.

त्यानंतर महिलांना हळदीकुंकू आणि वान देऊन हा हळदीकुंकू चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. अध्यक्ष नलिनी मोहिते उपाध्यक्ष रेखा राणे यावेळी गल्लीतील महिला उपस्थितीत होत्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24