नारीशक्ती महिला संघ तर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके व डॉ सोनाली सरनोबत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.सदर कार्यक्रम हा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता शाहूनगर येथील दत्त गल्लीमध्ये पार पडला.
प्रारंभी प्रमुख पाहुण्या डॉ सोनाली सरनोबत व मीनाताई बेनके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना मीनाताई व डॉ सोनाली सरनोबत यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर महिलांना हळदीकुंकू आणि वान देऊन हा हळदीकुंकू चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.