This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*भव्य खो-खो व हॉफ पीच क्रिकेट स्पर्धा*

*भव्य खो-खो व हॉफ पीच क्रिकेट स्पर्धा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव: तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा केंद्र कडोली आयोजित भव्य खो-खो व हॉफ पीच क्रिकेट स्पर्धा (राहुल ट्रॉफी )चे उद्घाटन काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

खो-खो स्पर्धा प्राथमिक कृषी पत्तीन संघ मैदान कडोली येथे घेण्यात आले होते.खो-खो स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25001₹, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 15001₹ तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 7001 ₹ व चषक ठेवण्यात आले होते.तसेच मुलींसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक 5001 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 2501 रुपये असे ठेवण्यात आले होते.

कमिटीच्या वतीने राहुल सतीश अण्णा जारकीहोळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील,ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील ,ग्रामपंचायत उपाध्यक्ष दीपा मरगाळे,पिकेपीएस अध्यक्ष गजानन कागणीकर,पंडित अतिवाडकर,शाम पाटील, आप्पाजी पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल जारकिहोळी म्हणाले की मंत्री व माझे वडील सतीश जारकिहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यमकंर्मडी मतदारसंघांमध्ये युवांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धा आम्ही भरवत असतो. त्यामध्ये प्रतिभा करंजी स्पर्धा,बॉडी बिल्डिंग स्पर्धा, कबड्डी स्पर्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा ठेवून युवकांना प्रोत्साहन देत असतो.व यापुढेही आपण असेच काम करत राहू यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य असेच आमच्या पाठीशी रहावे ही विनंती केली.

क्रिकेट हाफ  पीच  बुधवार दिनांक 7/2/2024 पासून सुरुवात होणार आहे.यामध्ये प्रथम पारितोषिक 25001 रूपये द्वितीय पारितोषिक 12001 रूपये असणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24