This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री अनिल बेनके ट्रॉफीचे थाटात उद्घाटन

श्री अनिल बेनके ट्रॉफीचे थाटात उद्घाटन
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री अनिल बेनके ट्रॉफीचे थाटात उद्घाटन

अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज सरकार मैदानावर थाटात करण्यात आले. यावेळी या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नटी इन न्यूज बेळगाव चॅनलचे राजशेखर पाटील उपस्थित होते.

 

सदर क्रिकेट स्पर्धा आजपासून आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून सुरू झाली आहे. बेळगाव मध्ये सरदार हायस्कूल मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केले असल्याचे उद्घाटनाप्रसंगी सांगितले.

 

त्याचबरोबर मुंबई आणि बेंगलोर मध्ये खेळलेले क्रिकेटपटू सरदार्स मैदानात खेळण्याची इच्छा व्यक्त करतात देश-विदेशातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळलेले खेळाडू बेळगावच्या सरदार मैदानावर खेळणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर क्रिकेट प्रेमींनी शांतपणे क्रिकेट स्पर्धा पहावी तसेच नागरिकांना कोणतीही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले त्यानंतर आमदार अनिल बेनके यांनी क्रिकेट खेळून या कार्यक्रमाला सुरुवात केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24