2014 साली चळवळीचा भाग म्हणून बेळगावात नोटा चा प्रचार केला, त्यांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे घालण्यात आले आज त्या गुन्ह्यातून सीमातपस्वी मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता झाली, आणि आम्ही त्यांचा छोटेखानी सत्कार करण्याच ठरवलं पण शेवटी ते मधु मामाच जसा मी सीमाप्रश्न सुटेपर्यंत चप्पल घालणार नाही तसाच कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही असे सांगून आपल्या तत्वांशी ठाम राहिले,
आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना शुभेच्छा दिल्या, आणि योगायोगानं आज कर्नाटकच्या राज्यपालांनी इथं होणाऱ्या कन्नड सक्ती ला चुकीचं ठरवत लाल पिवळ्या संघटनांना चपराक दिली तसेच केंद्राने सुद्धा काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या सीमाभाग समन्वय समिती निष्क्रिय आहे त्यांना बैठक घेण्यासाठी कानपिचक्या दिल्या. आजचा दिवस आम्हा बेळगावकरांसाठी महत्वाचा ठरला जतीमथ येथे सीमाप्रश्न सोडवणुकी प्रार्थना केली.