This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*9लाख 9 हजार 750रुपये किमतीच्या गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त*

*9लाख 9 हजार 750रुपये किमतीच्या गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीसीबी पोलीस पथकाने धाड टाकून लक्ष्मी नगर हिंडलगा येथे 9लाख 9 हजार 750रुपये किमतीच्या गोवा बनावटीची बेकायदा दारू सह एकूण 10 लाख 60 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती द्वारे सीसीबी पोलीस पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी राजेश केशव नायक वय 41 राहणार हिंडलगा याला अटक केली आहे.

यावेळी पोलिसांनी खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लक्ष्मी नगर हिंडलगा येथे सार्वजनिक ठिकाणी गोवा राज्यातून बेकायदेशीर दारू आणून विकली जात असल्याची माहिती मिळविल्यानंतर ही कारवाई केली आहे.

या कारवाई मध्ये विविध कंपन्यांच्या सुमारे 9 लाख 9 हजार 750रुपये किमतीच्या 186 लिटर दारूच्या बाटल्या दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दीड लाख रुपये किमतीची कार आणि रोख 350 असा एकूण दहा लाख 60 हजार 100 रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
पोलिसांनी केलेले या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24