प्राणी मित्र गणेश दड्डीकर आणि युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी एका कबुतराच्या पिल्लाला जीवदान दिले आहे.
शुक्रवारी सकाळी न्यू गुडशेड रोड येथील नर्तकी प्राईड अपार्टमेंट येथे कबुतराच एक पिल्लू जखमी व कुपोषित अवस्थेत राकेश साकरिया व प्रीतम शहा यांच्या फ्लॅट जवळ आढळून आले होते ही माहिती युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांना कळताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व प्राणी मित्र गणेश दड्डीकर यांना कळविली, गणेश दड्डीकर यांनी त्या पिलाला उपचारासाठी पशु वैद्यकिय दवाखान्यात दाखल केले.