This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आमची जमीन आम्हाला परत द्या: खादरवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा*

*आमची जमीन आम्हाला परत द्या: खादरवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1958 सालापासून खादरवाडी येथे शेतकऱ्यांच्या नावावर असलेली डोंगराची जमीन बेळगाव दक्षिणचे आमदारांनी आणि त्यांच्या एजंटने आपल्या नावावर करून शेतकऱ्यांची फसवणूक केला असल्याचा आरोप आज खादरवाडी गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केला.

यावेळी निवेदनात बेळगाव दक्षिणचे आमदारांनी खादरवाडी येथील शेतकऱ्यांना फसवून हडप केलेली जमीन पूर्ववत संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी खादरवासीयांनी भव्य धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे उपरोक्त मागणी केली.

यावेळी निवेदन देण्याकरिता शेतकरी महिला खादरवाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी त्यांनी जोरदार निदर्शने करून दक्षिणच्या आमदारांचा तीव्र निषेध केला.

यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडून निवेदन सादर केले

खादरवाडी येथे डोंगरा भाग आहे तो आमदाराने हडप केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चारा पुरवठा करण्यासाठी साठा कमी झाला आहे. सदर डोंगर विकला गेला तर जनावरांची उपासमार होईल तसेच डोंगरावर शेतकऱ्यांची जमीन आहे त्यामुळे सरकारने वर अन्याय न करता जमिनी हडप केलेल्या आमदाराला चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24