तब्बल तेरा वर्षांनी परंपरेप्रमाणे कंग्राळी बुद्रुक गावामध्ये घुगुळचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. चव्हाण पाटील कोनेरी जाधव या घराण्याच्या व्यक्तींनी घुगुळ कार्यक्रम पारंपरिक प्रमाणे उत्साहात कंग्राळी बुद्रुक येथे आज संपन्न करण्यात आला.
प्रारंभी लक्ष्मी मंदिर येथे वीरभद्रेश्वर देवाची पूजा करून या घुगुळ कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रत्येक घरामधून घुगुळ घेऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर कलमेश्वर मंदिराकडे जाऊन या घुगुल कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी झालेला हा घुगुळचा कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेड णारा होता
2010 मध्ये झालेली ही कंग्राळी बुद्रुक येथील ही यात्रा तब्बल 13 वर्षांनी पार पडली असल्याने
कंग्राळी बुद्रुक येथील माहेरवाशी, सुहासिनी , तसेच नातेवाईकांनी या घुगुळ कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.