बेळगाव :येथील उद्यमबाग परिसरामध्ये अरिस्टर ऑटोग्राफ हे महागड्या वाहनांची सर्विसिंग आणि देखभाल विक्री करण्याचे गॅरेज आहे. गॅरेजच्या वरूनच हस्कॉन ची मुख्य वीज वाहिनी गेली आहे.या वाहिनीला शॉर्ट सर्किट होऊन त्याची ठिणगी या गॅरेज मध्ये पडली. त्यामुळे गॅरेजमध्ये असलेली टाटा जनन ही चार चाकी गाडीनसह अन्य साहित्याने देखील पेट घेतला.
गॅरेजमध्ये अनेक साहित्य होते तसेच रिपेरी करण्याकरिता आलेल्या गाड्यांचे पेट्रोल डिझेल गॅरेज मध्ये पडले होते त्यामुळे अल्पावधीतच आगीने रौद्ररूप धारण केले. गॅरेजमध्ये एअर कॉम्प्रेसर मशीन टायर व अन्य साहित्य जळून देखील खाक झालेले आहे.
आग लागल्याची माहिती समजत आज गॅरेज मधील कामगारांनी पाणी मारून अग्निशमन उपकरणांचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे त्यांनी आग आटोक्यात आणणकरिता अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली या घटनेत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.