This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

अँपटेक एव्हिएशनचे 5 विद्यार्थी घेणार गगन भरारी

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अँपटेक एव्हिएशनचे 5 विद्यार्थी घेणार गगन भरारी

गोंधळी गल्ली येथील अँपटेक एव्हिएशन अँड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील इन्कम एव्हिएशन अँड हॉस्पिटल कंपनीत केबिन क्रू पदावर निवड झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन आज अपटेक एव्हिएशनच्या सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून युके 27 च्या एच आर मॅनेजर प्रीती उपस्थित होत्या तसेच याप्रसंगी संस्थेचे प्रमुख बिजनेस पार्टनर विनोद बामणे सरस्वती इन्फोटेकच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती बामणे देखील उपस्थित होत्या यावेळी त्यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला आनंद यावेळी व्यासपीठावर व्यक्त केला तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी साध्य करून दाखविले हा आत्मविश्वास पाहायला मिळाला.

यावेळेस निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अपटेक मुळेच आपली निवड नोकरीसाठी झाली असल्याने अपटेक मध्ये शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले तसेच त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे आज आपण उंच भरारी घेत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले अनुभव सर्वांसमोर व्यक्त केले त्यानंतर प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना प्रीती यांनी अपटेक विद्यार्थ्यांना देत असलेल्या प्रोफेशनल ट्रेनिंग बद्दल अपटेकचे कौतुक केले तसेच हे कार्य पुढे असेच त्यांनी चालू ठेवावे असे सांगितले यावेळी त्यांनी अपटेकला भरभरून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सत्कार समारंभास गोंधळी गल्ली येथील अपटेकच्या सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now