बेळगाव: उचगाव श्री मळेकरणी देवीची यात्रा मंदिर परिसरात करण्यास बंदी घालण्यात आली आहे.दर मंगळवार व शुक्रवार मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने श्री मळेकरणी देवीची यात्रा भरवली जाते . तर आता यात मंदिर परिसरात यात्रा करण्यास बंदी घालण्यात आली असून या निर्णयाची १ जून पासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
उद्या मंगळवार दिनांक २८ मे २०२४ रोजी शेवटची यात्रा भरवली जाणार आहे. ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि मळेकरणी देवी देवस्थान समितीच्या वतीने उचगाव गावात यात्रेला बंदी घालण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.श्री मळेकरणी देवीच्या नावाने दिला जाणारा मान आता केवळ गावातच दिला जाणार नाही.
तर अंगारा लावून कुठेही जाऊन दिला मान दिला जाऊ शकतो. फक्त उचगाव परिसरात यात्रा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.