This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रोटरी परिवार, बेळगाव तर्फे मोफत कृत्रिम अवयव शिबिर*

*रोटरी परिवार, बेळगाव तर्फे मोफत कृत्रिम अवयव शिबिर*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रोटरी परिवार, बेळगाव तर्फे मोफत कृत्रिम अवयव शिबिर, येत्या 3 डिसेंबर 2023 रोजी पार पडणार आहे .बेळगाव येथील रोटरी परिवार, पुणे येथील साधू वासवानी मिशन, आणि रोटरी क्लब व ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर 2023 रोजी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील भरतेश एज्युकेशन ट्रस्ट, फोर्ट रोड, बेळगाव येथे सकाळी 8.30 ते दुपारी 1.00 वा हा उपक्रम पार पडणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत रोटरीच्या सदस्यांनी दिली आहे .

रोटरी अनेक वर्षांपासून समाजातील गरजू आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. 37 वर्षांच्या परिश्रमानंतर, रोटरील भारतातून “पोलिओ” नष्ट करण्यात यश आले आहे. 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला पोलिओ मुक्त राष्ट्र केले आहे. तर कृत्रिम अवयव शिबिर हा गरजूंना दिलासा देण्याचा आणखी एक उपक्रम त्यांनी हाती घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

फक्त बेळगाव च नाही तर कर्नाटक, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी 3 डिसेंबर 2023 रोजी भरतेश एज्युकेशन ट्रस्ट, फोर्ट रोड, येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साधू वासवानी मिशनचे डॉक्टर आणि तंत्रज्ञांचे पथक या लाभार्थ्यांच्या सदोष अवयवांचे मोजमाप घेणार आहेत आणि सुमारे 4 ते 5 आठवड्यांनंतर, लाभार्थीना कृत्रिम अवयव बसविण्यासाठी कॉल करून पुन्हा एकदा बोलाविण्यात येणार आहे. अशीमाहिती देण्यात आली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24