This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी नाही*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वर नजीक सोलापूर गेट जवळ शॉर्टसर्किटमुळे एका खाजगी ट्रॅव्हलला भीषण आग लागून बस मधील किमती साहित्यासह संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी पहाटे ५ च्या सुमारास घडली आहे.

दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत बस चालक आणि वाहकासह जवळपास 40 प्रवासाची खूप बचावले आहेत. सदर बस ही मुंबई येथून बंगलोर कडे निघाली होती यावेळी बस मध्ये 38 प्रवासी होते.

पहाटे संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेट जवळ बस आली असता लायनिंग जाम झाल्यामुळे मागील चाकाचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले त्यामुळे बसच्या मागील बाजूने पेट घेतला त्यानंतर आग अवघ्या काही मिनिटातच पसरली आणि बस बेचिराख झाली.

चालकाने प्रसंगावधन राखणत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर याची माहिती मिळताच रस्ते देखभालीचे कंत्राट असलेल्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आणि अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले मात्र अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होई तोपर्यंत बस बेचिराख झाली होती या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now