बस खाली दुचाकी :सुदैवाने बचावला
बस खाली दुचाकी गेल्याने झालेल्या अपघातात एकजण सुदैवाने बचावला असल्याची घटना बेळगाव बागलकोट रस्त्यावरील शिंदोळी क्रॉस जवळ घडली आहे.
या अपघातात दुचाकीस्वार बाल बाल बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. गुलबर्गाहून बेळगाव कडे येणाऱ्या बस खाली सापडल्याने हा अपघात घडला
यावेळी बस चालकाने प्रसंग बदाम दाखवत ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी रात्री उशिरापर्यंत उत्तर रहदारी पोलीस स्थानकामध्ये अपघाताची नोंद झाली नव्हती.