This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गोरगरीब जनतेची प्रामाणिकपणे सेवा करावी : माजी महापौर विजय मोरे* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*गोरगरीब जनतेची प्रामाणिकपणे सेवा करावी : माजी महापौर विजय मोरे*

बेळगांव तारीख 23 जानेवारी 2024 : बेळगांव सिव्हील हॉस्पिटलभिस्म

सुप्रिडंट (MS) पदावरती डॉ. ईरांन्ना पल्लेद यांनी मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी मेडिकल सुप्रिडंट (MS) पदाची सूत्रे स्वीकारली.

 

यानिमित्त डॉ. ईरांन्ना पल्लेद यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बेळगावचे माजी महापौर आणि समाजसेवक श्री विजय मोरे आणि बेळगावचे माजी महापौर समाजसेवक श्री शिवाजी सुंठकर , माजी नगरसेवक श्री अनिल पाटील, माजी नगरसेवक श्री श्रीधर पाटील, समाजसेवक प्रा निलेश शिंदे, बेळगांव भिस्मचे मुख्य व्यवस्थाक व मॅनेजर श्री एल एस पंगणावर, बेळगांव भिस्मचे प्रभारी मुख्य व्यवस्थाक व मॅनेजर श्री भीमाण्णा कोणी, संतोष ममदापूर प्रकाश परांडेकर उमेश पाटील यांच्यासह बेळगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

माजी महापौर आणि समाजसेवक श्री विजय मोरे आपल्या मनोगत म्हणाले; बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून मी वेळोवेळी या सिविल हॉस्पिटल मध्ये येतो अनेक रुग्णांची सेवा करण्यासंदर्भात वेळोवेळी उपक्रम राबवून जनतेच्या कल्याणासाठी नेहमी सदोदित प्रयत्न करत असतो त्यामुळे बेळगावचे सिविल हॉस्पिटल हे मला नवीन नसून अनेक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही कार्य केलेले आहे सिविल हॉस्पिटल मध्ये काही कमतरता ज्या आहेत त्या दूर करून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय प्रामाणिकपणे कार्य करण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्या स्वतःलाच विचारून कोणतेही रुग्ण ओळखीचे असू देत किंवा नसू देत त्यांची अतिशय प्रामाणिकपणे काळजी घ्यावी आणि गोरगरीब जनतेला सहकार्य करावे असे विचार व्यक्त केले.

 

समाजसेवक प्रा. निलेश शिंदे पुढे म्हणाले; संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून हे दुर्गम भागातून गोरगरीब जनता या दवाखान्यामध्ये उपचार करण्यासाठी येत असतात त्यांची आर्थिक परिस्थिती पाहिला अतिशय कठीण असून उपचार करण्याला देखील काहींच्याकडे पैसे नाहीत असे रुग्ण या ठिकाणी येत असतात त्यामुळे त्यांची सेवा अतिशय काळजीपूर्वक करून मानव दृष्टिकोनातून जीव वाचवणे अत्यंत काळाची गरज आहे. कारण आजच्या या धावपळीच्या काळात अनेक प्रकारचे आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत त्याच्यावर योग्य पद्धतीने आरोग्यावरती उपचार करून सर्वसामान्य जनतेला सहकार्य सहकार्य करण्याची भावना डॉक्टर कर्मचारी यांनी घेतली तर मानवतेच्या पलीकडे जाऊन सेवा करण्याची वृत्ती वृद्धिंगत होते हे नाकारून अजिबात चालत नाही त्याच पद्धतीचे विचार प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मध्ये बिंबवले गेले तर कोणतेही सेवा ही कमी दर्जाचे नसून ती मनोभावे सेवा करण्याची वृत्ती ठेवली गेली पाहिजेत. बेळगाव सिविल हॉस्पिटल संदर्भात काही अडचणी आहेत त्या दूर करून सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनाने कार्य करून जनतेची सेवा करावी अनेक दुर्गम भागामध्ये असणाऱ्या गोरगरीब जनतेला सहकार्य करावे प्रत्येक क्षणाचा विचार करत आपल्या कुटुंबातील सदस्य आहे असे पाहून रुग्णांची सेवा केली गेली पाहिजेत कोणत्याही प्रकारची अडचण न करता सर्वांनाच सोयीस्कर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले तर गरीब जनतेचे कल्याण व्हायला अधिक वेळ लागणार नाही.

 

नूतन पदभार स्वीकारलेले सुप्रिडंट (MS) डॉ. ईरांन्ना पल्लेद सत्काराला उत्तर देत म्हणाले ; गेल्या अनेक वर्षापासून बेळगाव जिल्ह्यातील या रुग्णालयामध्ये मी सेवा करत आहे त्यामुळे येथील सर्व काही महत्त्वाचे घटक माझ्या लक्षात असून मी सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करू. गरीबी आर्थिक अडचणी या काय आहेत त्या आम्हाला चांगल्याच माहीत असून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अतिशय काळजीपूर्वक मी सर्व विभागांमध्ये तपासणी करून काही कमतरता असल्या हे ताबडतोब बदलून घेईन. जळगाव जिल्हा रुग्णालयातील काही अडचणी आहेत त्या जाणून घेऊन समस्या दूर करण्यासाठी मी सदोदित प्रयत्न करेन. पाठीमागे काय घडलं हे महत्त्वाचं नसून पुढील बेळगाव जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रामध्ये कल्याणकारी उपाययोजना ऐकण्यासाठी मी सदोतीत प्रयत्न राहीन. काही कमतरता असल्यास आपण आम्हाला सुचवाव्यात त्या दुरुस्त करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि बेळगाव जिल्ह्यातील जनतेला विनंती करेन की सरकारी सुविधांचा उपयोग चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात करून घ्यावा आणि आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे सेवा करेन.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now