विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता फुडफेस्ट आयोजन
बेळगाव सुभाष नगर येथील मराठा मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालय आणि एम.कॉम.चे पीजी सेंटर, आणि एमएससी (केमिस्ट्री) बेळगाव यांच्या तर्फे विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरिता आकृती फूड फेस्ट हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एच.जे. मोळेराखी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी कॉलेज मधील जवळपास 30 ते 40 विध्यार्थानी या मध्ये भाग घेतला होता.पाणी पुरी ,शेवपुरी ,केक ,लस्सी मोमोज ,फ्रेंच फ्राईज कटलेट ,पावभाजी ,सोलकडी ,यासह विविध पाककृती विध्यार्थानी बनविले होते.
यावेळी मराठा मंडळ कॉलेज आणि शाळेच्या मुलांनी सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला.याप्रसंगी प्रा. वेदा शिवपूजीमठ व प्रा.मनिषा चौगुले,यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रा. अर्चना भोसले प्रा. भाग्यश्री चौगुले तसेच विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.