बेळगांव:बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी अपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी बेळगाव येथून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम अपटेक कार्यालयात मध्ये पार पडला .
या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड चित्रपट अभिनेते सूरज देसाई हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
<span;>अपटेक विमानचालन,प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील करियर बनविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या प्लेसमेंट आणि गुणवत्ता प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
<span;>येथील विद्यार्थी देखील अंत्यत हुशार स्मार्ट असल्याने विद्यार्थ्यांची निवड होत असते असे मत सूरज देसाई यांनी बोलताना व्यक्त केले.
आज दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एअर इंडिया sats आणि Celibinas येथे ग्राउंड स्टाफ बेंगलोर एअरपोर्ट सी एस ए साठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी ग्रामीण भागातून असून त्यांना घडवण्याचे काम अपटेक ऍक्टिव्हेशन मध्ये झाले आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत केली आहे.मिस अंजली राठोड राहणार दांडेली हिची निवड एअर इंडिया sats पदी तर मिस दिव्या यादव राहणार दांडेलीची Celibinas येथे निवड झाली आहे.
<span;>यावेळी बेळगांव <span;>अपटेकचे व्यवसायिक भागीदार<span;> विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या एमडी ज्योती बामणे यांच्यासह विध्यार्थी पालक उपस्थित होते.