वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी नाष्टा आणि चहाचा घेतला आस्वाद
गोव्याहून बेळगावच्या दिशेने येत असताना खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस येथे एका हॉटेलमध्ये भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी नाष्टा आणि चहाचा आस्वाद घेतला.
सचिन तेंडुलकर नंतर आता आशिष नेहराने देखील घेतला बेळगावात चहाचा आस्वाद घेतल्याचे आज पाहायला मिळाले
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि इनोवा कार मधून आशिष नेहरा आणि त्यांचे सहकारी खानापूर येथे दाखल झाले होते. यावेळी येथील नागरिकांना कोणतीच कल्पना नव्हती. मात्र थोड्या वेळाने सर्वांच्या ही गोष्ट लक्षात येताच अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह नडला.
अत्यंत साध्या पेहऱ्यावर असणारा आशिष नेहरा यांच्यासोबत येथील असलेल्या जमलेल्या नागरिकांनी सेल्फी घेतला. यावेळी आशिष नेहरा यांनी मित्रांनो आधी मला नाश्ता करू द्या नंतर सगळ्यांशी बोलतो आणि सेल्फीही देतो असे म्हटल्यावर सर्वांना उत्सुकता लागली.
आणि या ठिकाणी उपस्थित असलेले काही खेळाडूंनी आशिष नेहरा सोबत सेल्फी घेतला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ही मच्छे येथे एका फौजी च्या स्टॉलवर चहा घेण्याकरिता आला होता.त्यानंतर आता आशिष नेहरांनी देखील जांबोटी येथे आपली उपस्थिती दर्शविली तसेच भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना पाहण्याची व त्यांना भेटण्याची संधी यावेळी स्थानिक तरुणांनी अनुभवली.