This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.खानापूर तालुक्यातील कोशे खुर्द येथे ही घटना घडली आहे.

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव भिकाजी धाकलू मिराशी (६३) आहे.घटनास्थळी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. गवी रेड्याने पाठीमागून हल्ला केला असण्याचा प्राथमिक अंदाज वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.भिकाजी हा शनिवारी दुपारी आपल्या शेताकडे गेला होता.

रात्र झाली तरी भिकाजी घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.रविवारी सकाळी भिकाजी पाटील रक्तबंबाळ होऊन मृतावस्थेत शेतात पडला असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले आणि त्याची माहिती कुटुंबीयांना दिली.नंतर वन आणि पोलीस खात्याला देखील ही माहिती देण्यात आली.वन आणि पोलीस खात्याचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता भिकाजी यांच्या पाठीवर वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे लक्षात आले. गवी रेड्याने पाठीमागून हल्ला करून पाठीत शिंगे खुपसली असण्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी इस्पितळात पाठवण्यात आला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now