This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर नेत्रदान*

*त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर नेत्रदान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर नेत्रदान

बैलहोंगल मृत्युंजय नगर येथील रहिवासी, निवृत्त माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विजयकुमार रामराव लालगे (75) यांचे काल वेणुग्राम रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी बैलहोंगल येथील डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्ट येथे त्याचे नेत्रदान केले .

केएलई रुग्णालयाच्या नेत्रपेढीला दात्यांनी दोन डोळे दान केले या दात्यामार्फत दोन अंध व्यक्तींना नेत्रदृष्टी मिळाली आहे.

तसेच त्वचा दान सुद्धा त्यांची करण्यात आली आहे.त्यांची त्वचा बेळगाव येथील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल रोटरी स्किन बँक ज्याचा वापर जलद उपचार प्रक्रियेसाठी जळलेल्या रूग्णांसाठी केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे शरीर दान सुद्धा करण्यात आले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काहेरच्या जेएनएमसी महाविद्यालयात त्यांचे शरीर दान केले

नेत्रपेढीचे समन्वयक डॉ.शिवानंद बुबनाळे, स्किन बँकेचे समन्वयक डॉ. राजेश पवार, शरीरशास्त्र विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. महांतेश रामण्णवार यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी देहदान केल्याबद्दल लालगे कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले.

देणगीदाराच्या पश्चात भाऊ, बहिण, पुतणे, सून आणि अनेक नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे. या वेळी वेणुग्राम रुग्णालयाचे संस्थापक व प्रख्यात जनरल सर्जन डॉ.श्रीपती पिसे हे मृतकाचे मामा आहेत, तसेच मृत व्यक्तीचे भाऊ प्रकाश रामराव लालगे हेही उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24