नैर्ऋत्य रेल्वेने काही महत्त्वाच्या एक्स्प्रेसना जादा डबे मर्यादित काळासाठी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसूर-बेळगाव एक्स्प्रेसला दि. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान १ जनरल सेकंड क्लास डबा जोडला जाणार आहे.
बेंगळूर-मिरज एक्स्प्रेसला दि. २३ ते २५ दरम्यान व बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेसला दि. २४ ते २६ रोजी सेकंड क्लास जनरल डबा जोडण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, त्याचबरोबर रेल्वे पोलीस भरतीसाठी होणारी गर्दी टाळण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने आहे.