This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

महाराष्ट्र *लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रेाजी घेण्यात येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाच्या परीक्षांची तारीख पुढीलप्रमाणे राहणार आहे:
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 – 16 जुन 2024
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 – 29 सप्टेंबर 2024
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024 – 17 मार्च 2024
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2024 – 27 जुलै 2024
सहायक मोटार वाहन निरिक्षक मुख्य परीक्षा 2024 – 26 ऑक्टोबर 2024
महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा 2024 – 17 नोव्हेंबर 2024
अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2024 – 9 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 – 10 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परिक्षा 2024 – 10 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2024 – 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 – 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 – 23 नाव्हेंबर 2024
निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2024 – 1 डिसेंबर 2024
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024 – 28,29, 30 व 31 डिसेंबर 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रकासोबत नमूद केले आहे की, हे वेळापत्रक शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त होईल या गृहितकावर आधारित आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यांमध्ये पदे विज्ञापित करणे आणि वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीचे अथवा परीक्षांच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणताही प्रकारचा बदल होऊ शकतो, बदल झाला तर आयोगाचे संकेतस्थळावर तसे प्रसिद्ध करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्यावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळावेळी अद्यायावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/ अधिसूचनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24