मिस इंडिया 2023 च्या विजेत्या एनीड जॉन यांचे बेळगांव मध्ये स्वागत
दिल्ली येथे झालेल्या मिस इंडिया 2023 आणि 24 च्या विजेत्या एनीड जॉन यांचा अपटेक एव्हिएशन मध्ये सत्कार करण्यात आला कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करत एनीड जॉन यांनी विजेतेपद पटकाविले असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना महिला सक्षमीकरण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यवस्थापकांनी जे काही त्यांनी साध्य करून दाखवले आहे त्यामुळे बेळगावासी यांना अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन केले. प्रारंभी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापक ज्योती बामणे अपटेकचे बिझनेस पार्टनर विनोद बामणे अपटेकचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते