इंगळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
हर हर महादेवच्या गजरात बसवन कुडचीत इंगळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंगळवारी सकाळी भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास धार्मिक विधी पार पडल्यानंतर मानकरी आणि पुजाऱ्यांच्या हस्ते इंगळ्याचे पूजन पार पडले.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही बसवन कुडचे येथील श्री बसवेश्वरचे कलमेश्वर आणि श्री ब्रह्मालिंग यात्रोत्सव निमित्त हा इंगळ्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जवळपास हजारोंच्या संख्येने भाविकांनी बसवन कुडचीत उपस्थिती लावली होती.
पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणे अत्यंत उत्साहात ही यात्रा पार पडली. यावेळी भक्तांच्या उपस्थितीने बसवन कुडची परिसर गर्दीने फुलून निघाला होता