बेळगाव महानगरपालिका नेहमीच या ना त्या कारणाने गाजत आली आहे. मराठी कन्नड मुद्दा, लाल पिवळा भगवा अशा एक ना अनेक कारणांनी बेळगाव महापालिकेचे नाव नेहमीच चर्चेत असते. तर आता पुन्हा एकदा महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असल्याने बेळगाव महानगरपालिका पुन्हा चर्चेत आली आहे . नियमानुसार पाच फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौरांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी नूतन महापौर उपमहापौर निवडणूक होणार आहे.
सध्या राज्यात काँग्रेसचे आणि स्थानिक पातळीवर भाजपची सत्ता आहे त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेत सध्या वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार संघर्ष सुरू झाला.
नूतन महापौर पदासाठी एससी एसटी महिला आणि उपमहापौर पदाकरिता सामान्य करिता आरक्षण लागू झाले आहे.महानगरपालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने भाजपचा महापौर होणार असं भाजप नगरसेवक हनुमंत कोंगाली यांनी सांगितलंय .