खानापूर रोड गोवावेस सर्कल येथे झालेल्या अपघातात एका महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. इंधन टँकर खाली सापडल्याने सदर वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या इंधन भरलेल्या टँकर ने जोराची धडक दिल्यान वृद्ध महिला वाहनाखाली सापडली आणि हा अपघात घडलाय.
मुस्लिम गल्ली अनगोळ बेळगाव येथील रहिवासी रुरय्या सय्यद वय 79 असे जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.तिच्यावर आता जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.