ड्रेनजची समस्या अवघ्या 12 तासातच केली दूर…
महिलांनी मानले सुनील जाधवचे आभार..
चवाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी नळाच्या पाईपलाईन मध्ये होत होते तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वामन शाहपूरकर व महिला वर्गाने मंगळवारी सायंकाळी सुनील जाधव यांच्याकडे केली होती, बुधवारी सकाळी सुनील जाधव यांच्या पुढाकारातून ड्रेनेजची समस्या अवघ्या 12 तासाच्या आत दूर झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले
गेल्या दिड महिन्या पासून या परिसरात दुर्गंधी व ड्रेनजचे पाणी नळाच्या चेंबर मध्ये घुसून येथील नागरिकांचे पिण्याचे पाणी व आरोग्य धोक्यात आले होते.
या परिसरातील चेंबर नादुरुस्ती होते.हे लक्ष्यात सुनील जाधव यांना आल्यामुळे मनपाच्या अधिकारांच्या सहकार्याने 12 तसाच जाधव यांच्या पाठपुरावा मुळे ड्रेनेज मिश्रीत पाण्याची समस्या सुटल्याने या परिसरातील महिला मंडळ संघाने सुनील जाधव यांचे आभार मानले