*जागतिक महिला दिनानिमित्त डॉ प्रीती कोरे दोडवाड यांनी पाणी वाचवण्यासाठी केलेले* *उलेखनिय कार्य*
“पाणी म्हणजे जीवन पाणी म्हणजे अमृत”
जिकडे तिकडे या पृथ्वीवर सिमेंट चे जंगल निर्माण होत असून पाण्याचे स्त्रोत असलेले नदी नाले तलाव विहिरी मुजवून अनेक जण त्या वर लोक वस्ती निर्माण करत आहेत झाडे व जंगल तोडून निसर्गाचे नुकसान करत आहेत अशा अनेक गोष्टी मुळे जागतिक तापमान वाढ प्रदूषण व पाणी टंचाई होत असून येणाऱ्या पाणी टंचाई व तापमान विरुद्ध आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही या साठी आपल्याला झाडे लावून व जमिनीत पाणी झिरपून ही पृथ्वी वाचावण्या साठी प्रत्येकानी हात भार लावला पाहिजे.
आज दिनांक 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो या दिवशी महिलांनी केलेल्या उ्लेखनीय कार्याचा गौरव केला जातो अशाच आपल्या बेळगाव मधील महिला *डॉ प्रीती कोरे दोडवाड* यांनी पाण्यासाठी समाज व लोकांमध्ये केलेल्या उ्लेखनीय कार्याचा जेवढी प्रशंसा कराल तेवढी कमीच आहे.
*डॉ प्रीती कोर दोडवाड* या प्यास फाउंडेशनच्या सेक्रेटरी असून या फाउंडेशन मार्फत पाण्याच्या समस्या सोडवतात त्यांनी आत्ता पर्यंत लहान मोठे असे 14 च्या वर तलाव व विहिरीचे पुनरजीवन करून लोकांना पाण्याचे महत्त्व व पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे त्यांच्या या कार्याची पद्धत ही येणाऱ्या पिढीला प्रेरणादेणारी आहे मुजलेले व बंद पडलेले तलाव विहीर नाले इत्यादी चा अभ्यास करून ते पुन्हा पूनरजीवित करून लोकांच्या कल्याण साठी वापर करतात हे फक्त माणसं साठी नाही तर पशुपक्षी यांच्या ही पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात पाणी टंचाई असताना त्यांनी टँकर द्वारे शहरी व ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली तसेच पर्यावरण रक्षणा साठी हजारो झाडे लावलीत कोरोना च्या काळात अनेक गोर गरीब लोकांना जीवन आवश्यक वस्तू व धान्य वाटप करून मदती चा हात दिला पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश देत येणाऱ्या युवा पिढीला जण जागृती करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात.तसेच शालेय शिक्षण घेत असलेला गोर गरीब व होतकरु व हुशार विद्यार्थ्यासाठी शिक्षण क्षेत्रात भरिव कामगिरी केली आहे येणाऱ्या काळात पाणी वाचवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हात घेतले असून त्या पूर्ण करणे साठी त्यांची धडपड सुरू आहे त्या राबवत असलेल्या लोकल्याणसाठी सेवा करत असलेल्या कर्तृत्ववान *डॉ प्रीती कोरे दोडवाड* यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.