बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात कन्नड विभागातर्फे ज्ञानपीठ विजेते साहित्यकार कुवेंपु यांचा जन्मदिवस “विश्व मानव दिवस” म्हणून साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गीतांजली शहापूरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ.एच. जे. मोळेराखी यांनी भूषवले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी कमतगी ने कन्नड नाडगीताने केली . तद्नंतर कन्नड विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग घानगेर यांनी कुवेंपु विषयी प्रस्तावना प्रस्तुत करून उपस्थितांचे स्वागत केले.
कुवेंपुंच्या फोटो पूजा नंतर प्रमुख अतिथी स्थांनावरून बोलताना डॉ. गीतांजली शहापूरकर म्हणाल्या, कुवेंपुचे साहित्य हे केवळ एका भाषेसाठी सीमित नव्हते. त्यांचे साहित्य सर्व जाती, धर्म समुदायासाठी उपयोगी होते.त्यांच्या साहित्यातून विश्वशांतीचा संदेश प्राप्त होतो.
प्राचार्य डॉ.एच. जे.मोळेराखी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि,कुवेंपुचे साहित्य जनसामान्यांचे साहित्य होते. ज्याच्या मधून जनसामान्यांचे जीवन, समस्या आणि समाधान मांडण्याचे कार्य केले.नदीच्या प्रमाणे कुवेंपुचे साहित्य विशाल होते. कार्यक्रमाच्या शेवटी बसवराज गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.डॉ. डी. एम. मुल्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
D Media 24 > Local News > *कुवेंपुचे साहित्य विश्व शांती देणारे-डॉ. गीतांजली*
*कुवेंपुचे साहित्य विश्व शांती देणारे-डॉ. गीतांजली*
Deepak Sutar29/12/2023
posted on
Leave a reply