This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार*

*शहरात  डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार*

शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार

शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानात , डॉ बाबा साहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंती निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीत ही जयंती साजरी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली .

यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले यांनी शांततेत आणि अर्थापूर्ण रित्या तसेच आचार संहितेचे उल्लंघन न करता , मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी पुढे ते म्हणाले दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता , बेळगावच्या अशोक सर्कल येथून , वीरज्योतीची मिरवणूक सुरु होईल . त्यानंतर कसाई गल्ली ,चव्हाट गल्ली , संगोळी रायन्ना सर्कलमार्गे , चन्नम्मा सर्कल येथून , डॉ . बाबासाहेब ही मिरवणूक पोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनेजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी वीरज्योतीचे स्वागत करतील .

त्यानंतर पुन्हा ही ज्योत काली आमराई , कंग्राळगल्लीमार्गे , छत्रपती संभाजी चौकात दुपारी १२ वाजता पोचेल आणि त्या ठिकाणी , सरकारी कार्यक्रमानुसार मिरवणुकीला सुरुवात होईल . मिरवणूक आंबेडकर उद्यानात पोचल्यावर त्या ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या २०२३ -२४ सालासाठी नूतन अध्यक्ष म्हणून ,बसवराज रायगोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
यावेळी , अर्जुन डेमट्टी , मल्लेश कुरंगी , राहुल मेत्री , जीवन कुरणे , महादेव तळवार , सिद्दप्पा कांबळे , कलाप्पा रामचन्नावर , यलाप्पा कोलकार , सुधीर चौगले , संतोष कांबळे , सिद्राई मेत्री आणि इतर उपस्थित होते


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply