This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*युवा समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*

*युवा समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युवा समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने युवा समिती कार्यालय टिळकवाडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला, तसेच बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आमचा लढा असून लोकशाहीचा निश्चित विजय होईल अशी आशा व्यक्त केली, युवा नेते शुभम शेळके यांनी बाबासाहेबाना अभिवादन करत बाबासाहेबानी सीमाभागावर अन्याय झाला असून हा प्रदेश महाराष्ट्र राज्यात विलीन होऊन संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी भूमिका मांडली होती व आपल्याला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे विचार व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे, उपखजिनदार इंद्रजित धामणेकर, सागर कणबरकर, चिटणीस प्रतीक पाटील, संभाजी शिंदे, दिनेश मोरे, आनंद पाटील, हेमंत पाटील, यल्लपा पाटील, शाम किरमटे आदी उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24