आज समादेवी देवस्थान येथील श्री समादेवी देवीला साडेचार लाखांचा हिऱ्यांचा हार दानशूरांनी अर्पण करून देवीची सेवा केली आहे.
येथील शहापूर मधील श्री समादेवी देवीला हिऱ्यांचा हार बापूसाहेब अनगोळकर यांनी देऊ केला आहे तसेच ही देणगी देऊन भरीव अशी मदत केली आहे.
त्यांनी देवीला हिऱ्यांचा हार अर्पण केल्याबद्दल श्री समादेवी संस्थान शहापूर आणि समस्त कार्यकारी मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात येत आहे
अनगोळकरांचे नाव फक्त वैश्यवाणी समाजामध्ये नव्हे तर बेळगाव मधल्या दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये देखील अग्रभागी येते. बेळगाव मध्ये त्यांनी वाखान्याजोगी कार्य केली आहेत तसेच त्यांनी आत्ता देवीला डायमंड चा हार देऊन देवीची सेवा केली आहे.