सांबरा कुस्ती कमिटीच्यावतीने आयोजित गतवर्षीच्या आखाड्याच्या अहवालाचे वितरण करण्यात आले.
मारुती मंदिर येथे आयोजित बैठकीत नितीन चिंगळी यांनी गतवर्षी यशस्वीपणे पार पडलेल्या आखाड्याच्या आढावा घेत जमा-खर्च सादर केला. बिल्डिंग काँट्रॅक्टर कृष्णा चौगले, पियुष श्रीकांत जोगानी यांच्या हस्ते अहवालाचे वितरण करण्यात आले. देणगीदार, आखाडा बनवण्यासाठी सहाय्य केलेल्या गावकऱ्यांचे यल्लाप्पा हरजी यांनी आभार मानत आगामी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला गावकर्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी इराप्पा जोई, लक्ष्मण सुळेभावी, कृष्णा जोई, भरमा चिंगळी, भुजंग गिरमल, शिवाजी मालाई, भुजंग धर्मोजी, अप्पानी यड्डी, शितल तिप्पन्नाचे, मोहन हरजी, शिवानंद पाटील, सिद्राई यड्डी, मारुती चौगले, देवाप्पा आप्पयाचे, प्रवीण ताडे, सिद्राई जाधव, यल्लाप्पा जोगाणी, कृष्णा आप्पयाचे आदी उपस्थित होते.