वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात जेवणाचे वाटप
मोठ्यांचे आशीर्वाद जीवनामध्ये महत्त्वाचे असतात त्यामुळे एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी आपल्या मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त शांताई विधाश्रमातील आजी आजोबांसोबत आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला आणि येथील वृद्धांना जेवणाचे वाटप केले.
अलिष्का अनिल बेनके हीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मीनाताई बेनके वृद्धाश्रमात दरवर्षी अन्नदान करतात. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्न वितरित केले
यावेळी सर्वांनी अलिष्काचा वाढदिवसाचा केक कापला आणि तिला आशीर्वाद दिला त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतला यावेळी वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबा उपस्थित होते.