विठ्ठल नामाचा गजर करत संत मीरा शाळेच्या बालचमूची दिंडी यात्रा.
बेळगांव,30.अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या शिशुवाटिकेच्या मुला- मुलींनी विठ्ठल नामाचा गजर करत शाळेच्या प्रांगणात दिंडी यात्रा काढली.
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विणाश्री तुक्कार या मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून पालखीला चालना दिली याप्रसंगी शिशुवाटिकेच्या विद्यार्थ्यांनी
पायी दिंडी,शाळेतील प्रांगणात विठ्ठलरखुमाई,नामदेवतुकाराम राधा श्रीकृष्ण ,वारकरी यांची सुंदर वेशभूषा करून दिंडी शाळेच्या गणेश मंदिरात आगमन होताच आरती ,पूजा करून प्रसाद वाटण्यात आला, लहान मुलांचे व शिक्षकांचे कौतुक पालकांनी केले, व वारकरी संप्रदाय असाच अखंड सुरू राहील यासाठी प्रेरणा दिली,दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका विणाश्री तुक्कार शामल दड्डीकर, निकिता मेणस सीमा कामत
पुष्पांजली धोत्रे भक्ती कुट्रे , क्रीडा शिक्षक मयुरी पिंगट, चंद्रकांत पाटील ,शिपाई रेखा मलतवाडकर, सुरेखा शहापूरकर, यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.