डीजीपी अलोक मोहन यांची बेळगावला भेट
राज्य सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपपोलीस महासंचालक (डीजीपी) अलोक मोहन यांनी आज बुधवारी बेळगावला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाच्या ठिकाणी त्यांचे पोलीस इतमामात शानदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आणि शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्यासह शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.