This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*सांबरा येथील भाविक उद्या सोमवार दि. 29 रोजी यल्लाम्मा यात्रेसाठी सौंदत्तीकडे करणार प्रस्थान*

*सांबरा येथील भाविक उद्या सोमवार दि. 29 रोजी यल्लाम्मा यात्रेसाठी सौंदत्तीकडे  करणार प्रस्थान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांबरा येथील भाविक उद्या सोमवार दि. 29 रोजी यल्लाम्मा यात्रेसाठी सौंदत्तीकडे प्रस्थान करणार आहेत. यावर्षी महालक्ष्मी यात्रा असल्याने संपूर्ण गावची ‘फरशी ‘ जाणार आहे.

सोमवारी सकाळी 8 वा. ग्रामदैवत दुर्गादेवी मंदिरात पूजा करून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावाच्या वेशीतून प्रथमता हकदार आणि मानकऱ्यांची वाहने त्यापाठोपाठ गावाकऱ्यांची वाहने मार्गस्थ होणार आहेत. बाळेकुंद्रीपर्यंत भाविक सवाद्य मिरवणूकिने चालत जाणार आहेत. सकाळी 11 वा हनुमानहट्टी येथे हकदारांच्या पडली भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यल्लाम्मा डोंगरावरील जोगुळभावी येथे दुपारी 2 वा गावाकऱ्याकडून पडली भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवारी दुपारी 12 वा गावाकऱ्यांचा सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी हकदार आणि गावाकऱ्यांकडून श्री रेणुका देवींची ओटी भरण्यात येणार आहे. गुरुवार दि 1फेब्रुवारी भाविक गावात परत येवून माळरानात वस्ती करणार आहेत. शुक्रवारी माळावर गावाकऱ्यांचा सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक घराकडे माघारी फिरणार आहेत, अशी माहिती देवस्थान कमिटीने कळवळी आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24