बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या अनेक समस्या आहेत त्यामुळे या सर्व समस्या सरकारने सोडाव्यात याकरिता आज नेगील योगी राज्य शेतकरी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता आले.
यावेळी खानापूर तालुक्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले असता पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आणि रस्ता बंद करून निदर्शने केली.
यावेळी अचानक रस्ता बंद झाल्याने हे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये पुन्हा वाद झाला अखेर शेतकऱ्यांनी वाट मोकळी केली त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.