22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम चंद्राची मूर्ती व प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण भारतात या सोहळ्यामुळे नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे सर्व देशवासीयांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र व सात्विक होत आहे संपूर्ण भारतातील असंख्य मंदिरामध्ये या दिवशी भजन, कीर्तन, सामूहिक नामजप ,महाप्रसाद, अशा स्वरूपात अत्यंत पवित्र्याने व उत्साहात सर्व भारतीय साजरा करत आहेत.
तरी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवशी निपाणी भागात मास, मच्छी, मांसाहार, व दारू याची विक्री बंद ठेवून या होणाऱ्या पवित्र कार्यात सहभाग होऊन उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी श्रीराम सेना कर्नाटक यांच्याकडून निपाणी उप. तहसीलदार मृत्युंजय डंगी यांना तसेच निपाणी नगरपालिका कमिशनर साहेब यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली या निवेदना वेळी श्रीराम सेना कर्नाटक चे निपाणी तालुका प्रमुख अमोल चेंडके., बबन निर्मले, अजित पारळे, अजित पाटील, चारुदत्त पावले, रवींद्र शिंदे, पवन अंकुशे, आर्यन माने, प्रथमेश माने, उपस्थित होते.