माजी मुख्यमंत्री यांचे राजकीय सल्लागार आणि दिल्ली प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना लोकसभा निवडणुकी करिता बेळगाव मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी विविध समाज व संघटनाने केली आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकी करिता एका तिकिटासाठी भाजपच्या दोघांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.
गेल्या 35 वर्षापासून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून आणि बेळगाव मध्ये बुडाचे अध्यक्ष उद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील शंकरगौडा पाटील यांनी काम केले आहे.
तर दुसरे इच्छुक उमेदवार महांतेश कवटगीमठ हे सुद्धा तिकिटाकरिता इच्छुक असल्याने रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे नेमके तिकीट कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे.दोन्ही इच्छुक उमेदवार आपले राजकीय बळ आजमावत आहेत.