डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आई आणि बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज बेळगावात घडली आहे. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड गावातील लक्ष्मी हल्ली वय 28 यांना प्रसुती वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी लक्ष्मी यांना रुग्णालय दाखल केले.
यावेळी रविवारी रात्री उशिरा बेळगाव तालुक्यातील केणा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले यावेळी लक्ष्मी यांनी एका मुलीला जन्म दिला.
नंतर लक्ष्मी यांना प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारा करीता डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात लक्ष्मी यांना नेण्याचा सल्ला दिला . यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालिकेचा आणि आईचा अशा दोघचा मृत्यू झाला आहे